मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना जोर पकडला आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हो नाही करत शेवटी आपले काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. दरम्यान, त्यांच्या प्रचारासाठी मनसेने मुंबईत प्रचारसभा घेतली होती.

या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेला भाजपसोबतच्या जागा वाटपा वरून लक्ष्य केले होते. त्यालाच आता शिवसेनेकडून उत्तर देण्यात आले आहे. पुढच्या निवडणुकीत ते फक्‍त पेपर वाचण्याचे काम करतील असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रचार सभेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला धारेवर धरले होते. भाजपने राज्याचे वाटोळे केले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच राज्याला सक्षम अशा विरोधी पक्षाची गरज असल्याचे म्हटले होत.

तसेच सत्तेत केवळ आपल्या पक्षाचे आमदार असून उपयोग नसतो सरकारला सवाल करण्याची धमक आपल्यात असायला हवी असे सांगत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला होता. तसेच एवढी वर्ष युतीत सडली आणि शेवटी 124 वर अडली असल्याचे सेनेला म्हटले होते. या सर्व गोष्टींचा अखेर सेनेकडून समाचार घेण्यात आला आहे. पुढील निवडणूकीत ते फक्‍त पेपर वाचण्यापूरते शिल्लक राहतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

                           

Find out more: