नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाला माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योतकौर सिद्धू यांनी सोडचिठ्ठी दिली असून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्याचवेळी कोणत्याही राजकीय पक्षासोबत आपण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ एक सामाजिक कार्यकर्ता सध्या मी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अमृतसर पूर्व मतदारसंघातच नवज्योतकौर सिद्धू यांनी काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्याचवेळी आता काँग्रेस सोडून भाजपमध्ये नवज्योतसिंग सिद्धूही प्रवेश करणार असल्याची चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. नवज्योतसिंग सिद्धू यांनी जुलै महिन्यात पंजाबमधील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मत्रिमंडळातून काढता पाय घेतला होता. आपल्या मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला.

काँग्रेस २०१७ मध्ये पंजाबमधील निवडणुकीत सत्तेवर आल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू होते. पंजाबच्या उपमुख्यमंत्रीपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची नेमणूक होईल, अशी शक्यता होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयामध्येही बदल करण्यात आला. नवज्योतसिंग सिद्धू तेव्हापासून नाराज होते. या दोघांमधील वाद लोकसभा निवडणुकीवेळी विकोपाला गेला होता. नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

                                                                    

Find out more: