मुंबई : महाराष्ट्रची कुंडली आम्ही शिवसेना ठरवणार असून कुठे कोणते ग्रह ठेवायचे हे आमच्या हातात असल्याचे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.प्रत्येक जण आपला आपला नेता निवडतोय, आम्हीही उद्या नेता निवडत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही सोबत राहण्यात महाराष्ट्राचा हित आहे. शिवेसेनेचा कुठलाही आमदार फुटणार नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेचे 23 आमदार जर भाजपच्या संपर्कात आहेत तर तुम्ही फक्त आकडे बांधा असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
राजकारणात कोणी कोणाचा शत्रू अथवा मित्र नसतो असे विधान राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशी वक्तव्ये करावी लागतात, त्यानुसार अजित पवारांनी पाठिंब्याचे वक्तव्य केलं आहे.
भाजपाचा कोणता फॉर्म्युला आहे ? यासाठी आम्ही काही नोंदवही घेऊन बसलेलो नाही. फॉर्म्युला कोणता आला असेल तर ती एक पुडी असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. जोपर्यत लिखित स्वरूपात प्रस्ताव भाजपकडून येत नाही तोपर्यंत शिवसेनेची भूमिका आमच्याकडून स्पष्ट होणार नाही. स्थिर सरकार होण्यासाठी जे ठरलंय ते तसच व्हायला हवं त्यात मुख्यमंत्री पदसुद्धा आलं असेही ते म्हणाले.