राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे.” अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे. विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी भाजप शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरु होता.

शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी अडून बसली होती, तर भाजपनेही मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार नसल्याच स्पष्ट केल्याने युतीत फुट पडली.

अशा परिस्थितीत भाजप, शिवसेनेला बहुमत सिध्द न करता आल्यामुळे त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतल्यामुळे कोणत्याही पक्षाला बहुमत सिध्द करता आले नाही.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी वेळ देऊनही कोणत्याही पक्षाने पुढे येऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला .मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत सिध्द करता आले नाही.                                                                                                                                                            

Find out more: