नवी दिल्ली – भारतीय संघाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. आर. अश्विनने बांगलादेशविरुद्ध इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात घरच्या मैदानावर आपल्या कसोटी कारकीर्दीतील 250 वा बळी मिळविला. यासह, तो होम ग्राउंडवर सर्वात जलद 250 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.
अश्विनने बांगलादेश संघाचा कर्णधार मोमीनुल हक याचा 37 धावांच्या वैयक्तिक धावांवर त्रिफळा उडवत कसोटी कारकीर्दीतील 358 वा बळी घेतला. आर अश्विनने हे 250 बळी भारतीय मैदान घेतले आहेत. घरच्या मैदानावर आर अश्विन किती प्रभावी आहे हे यावरून दिसून येते. आर. अश्विनची गोलंदाज कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 59 धावा देऊन 9 गडी बाद केले होते.
उजवा हाताचा ऑफ ब्रेक गोलंदाज आर अश्विन हा भारताकडून अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या आधी अशी कामगिरी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी केली आहे. अनिल कुंबळेने भारतीय भूमीवर 350 गडी बाद केले आहेत, तर भज्जीने मायभूमीत एकूण 265 बळी घेतले आहेत. या तीन गोलंदाजांशिवाय कोणताही भारतीय खेळाडू या टप्प्यावर पोहोचलेला नाही.
अश्विनने रचला हा विश्वविक्रम
अश्विनसर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये 250 आणि 300 गडी बाद करणारा पहिला खेळाडू आहे. त्याचबरोबर वेगवान 350 कसोटी विकेट घेण्याचा जागतिक विक्रमही आर. अश्विनने संयुक्तपणे आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने 66 कसोटी सामन्यात 350 विकेट्स पूर्ण केल्या होत्या. आर अश्विननेही अनेक सामन्यांमध्ये हे आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.