नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संसदेतील ज्येष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील 250 व्या सत्रात संबोधित केले. मोदींनी यावेळी राज्यसभेचा आतापर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी राज्यसभेतील आतापर्यंतच्या प्रवासातील अनेक गोष्टींवर भाष्य केले. यात राष्ट्रवादी आणि बीजेडी पक्षाचे त्यांनी कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला राष्ट्रवादी पक्ष आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजू जनता दल (बीजेडी) या पक्षाकडून संसदीय कामकाज शिकण्यासारखे असल्याचे मोदींनी म्हटले. संसदेत हे पक्ष आपली भूमिका प्रभावीपणे मांडतात. त्यांच्या कडून या बाबी प्रत्येक पक्षाने शिकायला हव्या, असा सल्लाही मोदींनी यावेळी दिला.

माजी पंतप्रधान अटलजींच्या राज्यसभा हे दुसरे सभागृह आहे पण ते दुय्यम नाही या विधानाचा दाखला देत राज्यसभा देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते, असेही मोदी यावेळी म्हणाले. राज्यसभेत कलम ३७० संदर्भातील झालेला निर्णय माझ्यासाठी खास असल्याचा उल्लेखही मोदींनी यावेळी केला.                                                                                                                              


Find out more: