शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढील 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच अजित पवारांशी संवाद सुरु आहे. त्यामुळे सगळ काही ठीक होईल, असा सुतोवाच संजय राऊतांनी केला आहे.
राज्यात सत्तासंघर्ष सुरु असतानाचं महाविकासआघाडीच्या गोटातून मोठे वृत्त येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी सुरवातीला दिली होती. कॉंग्रेस – राष्ट्रवादीने शिवसेनाला पाठींबा देत सरकार स्थापनेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठरलेल्या फॉर्म्युल्या प्रमाणे मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे असणार आहे.
शिवसेनेकडून मुख्यमंत्री पद कोण बसणार याबाबत गेले अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. या चर्चेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांनीचं मुख्यमंत्री पद स्वीकारावे अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यास तयारी दाखवली आहे.