मुंबई : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर गारूड निर्माण करणाऱ्या ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली.

येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतिर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं. या शपथविधीसाठी भाजपाध्यक्ष अमित शाहांनाही निमंत्रण देणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

‘उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिलं जाईल का?’ या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘होय, आम्ही सर्वांना बोलावणार आहोत. अमित शाहांनाही निमंत्रण दिलं जाईल.’ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. शिवाय शपथविधीचं ठिकाण आणि वेळही तातडीने जाहीर करण्यात आली. 
                                 

Find out more: