काल पद आणि गोपनियतेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर, त्यांनी आज मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. अद्याप विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे उद्धव ठाकरे हे सदस्य नाहीत. सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सभासद व्हावे लागेल.

 

विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यामुळे आता दुसऱ्या आमदाराला राजीनामा द्यायला लावून पुन्हा विधानसभेची पोटनिवडणूक लढवणे हे तसे सोईचे नाही. त्याऐवजी उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जातील असे सांगण्यात येत आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जातील सध्या असे तरी चित्र आहे.

 

शिवसेना आमदार तानाजी सावंत हे सध्या या परांडा विधानसभा मतदारसंघात नेतृत्त्व करतात. पण उस्मानाबादेतील परांडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत यांनी निवडणूक लढवून ते विजयी झाले असल्यामुळे आता यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाल्यामुळे आता या जागेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाण्याची चिन्ह आहेत.                                                                                         

Find out more: