” माझ्या फेसबुक पोस्टवरील पक्षांतराच्या बातम्यानंतर उलट माझ्यावरच पदासाठी मी हे करत असल्याचा आरोप होत आहे. खरंतरमला कुठलं पद मिळू नये म्हणून तर असं सुरु नाही ना असा मला प्रश्न पडला आहे.” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदिल्या आहेत.
पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर भाजपचे नेते राम शिंदेआणि विनोद तावडे यांनी आज (3 डिसेंबर) पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिकास्पष्ट केली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी 12 डिसेंबरला बोलेल असं मी सांगितलं होतं. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवाआहे. तो वेळ मला दिला पाहिजे. मी ती पोस्ट आत्ता केली आणि आत्ताच त्यावर बोलणं, भाष्य करणं मला शक्य नाही. पण इतकंचसांगते की मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. माझ्या पोस्टवर सुरुवातीला सर्वच चॅनलने व्यवस्थित बातमी दिली.
मात्र, एक दोन वर्तमानपत्रांनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी केली. यानंतर या सर्व चर्चेला वेगळा सूर आला आणि वेगळ्यापद्धतीने हाताळणी सुरु आहे. त्यामुळे मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे.” पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी अत्यंत पोटातून समर्पनानेसेवा केलेली आहे. कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारलेली नाही. तसंच कोणतंही पद मागण्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही. हेमाझ्या रक्तात नाही. त्यामुळे या ज्या चर्चा सुरु आहेत त्यांनी मला व्यथित केलं. .”