आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जमीन फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांना सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. आज (त. ४ ) सर्वोच्च न्यायालयानं दोन हमीदारांसह २ लाख रूपयांच्या बॉण्डवर न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती आर. बानुमती यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठानं हा निकाल दिला.
दरम्यान, अटक झाल्यापासून चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. तथापि परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही. चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करावे लागेल. साक्षीदारांना भेटण्याचा आणि त्यांना प्रभावित करण्यास मज्जाव. या प्रकरणी माध्यमांना मुलाखती देण्यास, बोलण्यास बंदी. आदी अटी चिदंबरम यांना न्यायालयानं निकाल देताना घातल्या आहेत.