उन्नाव बलात्कारातील पीडीतेचा आज मृत्यू झाला आहे. दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयात उपचार दरम्यानचं तिने अखेरचा श्वास घेतला आहे. रायबरेलीतून सुनावणीसाठी जाताना नराधमांनी तिच्यावर केरोसीन ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती 90 टक्के भाजली होती. अखेर काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी हृदय विकाराचा झटक्याने तिचा मृत्यू झाला.

 

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिला आहे. ‘दुःखद..! बलात्कारामुळे आणखी एक निष्पाप जीव गेला.उन्नाव जळीत आणि बलात्कार प्रकरणातील पिडीतेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.भावपूर्ण श्रद्धांजली. तिला आणि इतर बलात्कार पिडितांना न्याय मिळायलाच हवा. आता हे अति झाला आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

 

बलात्कार पीडित तरुणीला केरोसिन टाकून जाळण्यात आल्यानंतर तीला सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी तीला विमानतळ ते सफदरजंग रुग्णालयात ग्रीन कॉरीडोर तयार केला होता. तीला लखनऊवरुन विमानाने दिल्लीला आणण्यात आलं होतं.
आमच्या अथक प्रयत्नांनंतरही आम्ही पीडित तरुणीला वाचवू शकलो नाही.

 

संध्याकाळी तरुणीची तब्येत खूप खालावली. रात्री 11 वाजून 10 मिनिटाला तरुणीला हृदय विकाराचा झटका आला. आम्ही तीला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण 11 वाजून 40 मिनिटांनी तीचा मृत्यू झाला” अशी माहिती प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शलभ कुमार यांनी दिली.

 

दरम्यान एकूण सहा जणांनी मिळून तिच्यावर हल्ला केला होता. यात हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश बाजपेयी आणि बलात्कारातील आरोपी शिवम त्रिवेदी, शुभम त्रिवेदी यांनी हल्ला केला. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं.

 

2018 साली आरोपी शिवम त्रिवेदी, शुभम त्रिवेदी यांनी अपहरण करुन बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. याच संदर्भातील प्राथमिक तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी जळलेल्या लस्थेतच खूप दूरपर्यंत पळत आली होती.

Find out more: