शिवसंग्रामचे संस्थापक, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना नव्या सरकारच्या एका समितीमध्ये संधी मिळाली आहे. विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर ते विशेष निमंत्रित सदस्य असतील. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची नेमणूक केली.

 

विधानपरिषदेत सदस्य असलेल्यांमध्ये मेटे सर्वांत सिनिअर आहेत. मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षण लढ्याच्या चळवळीतून पुढे आलेल्या मेटे यांना प्रथम युती सरकारमध्ये विधानपरिषदेवर संधी मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पुन्हा तीनवेळा विधानपरिषदेवर संधी मिळाली.

 

गतवेळी भाजपनेही त्यांना विधानपरिषदेवर घेतले. युती सरकारने त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्ष केले होते. सध्याच्या नवीन सरकारमध्येही त्यांना विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर स्थान मिळाली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या समितीचे सदस्य आहेत. तीन विशेष निमंत्रितांत मेटे यांचा समावेश आहे.                                                                                                                                                                  

Find out more: