राज्यात ठाकरे सरकार स्थापन होऊन आठवडा होऊन गेला आहे. पण अद्याप खातेवाटपाचा मुहूर्त ठरलेला नाही. खातेवाटपाच्या चर्चा अंतिम टप्पात आहेत असे महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांनी कडून सांगण्यात येत आहे.
खातेवाटपाच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी आक्रमक झाले. रविवारी भाजपची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी खातेवाटपाबाबत भाष्य केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या बापाने मला स्वतःच्या संसारावर लक्ष ठेवायला शिकवले आहे. दुसऱ्याचा संसार पहायला त्यांचा बाप आहे,’ असे पाटील म्हणाले. तसेच पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत भाष्य केले.
ते म्हणाले, ‘काल एक तास आमची चर्चा झाली. त्यांचा जो आक्षेप आहे की त्यांच्या मुलीला पाडण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले. या संदर्भाची आम्ही पुरावे मागवले आहेत. कुणी असे काही केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई नक्की केली जाईल, असे पाटील म्हणाले.