
एका रॅलीमध्ये बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी ,मेक इन इंडिया नाही तर आता रेप इन इंडिया झाले आहे’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर संसदेत भाजप खासदारांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र आता राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजप ईशान्य भारतात घडत असलेल्या घटनांवरून लक्ष हटवण्यासाठी हे करत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, माझ्या मोबाईलमध्ये नरेंद्र मोदी दिल्लीला ‘रेप कॅपिटल’ म्हणत आहेत, त्याची क्लिप आहे. मी ते ट्विट करेल, जेणेकरून सर्वजण पाहू शकतील. ईशान्य भारतात होत असलेल्या निदर्शनांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप हे असले मुद्दे उपस्थित करत आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत असल्याचा व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर केला. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, ईशान्य भारत जळत आहे, अर्थव्यवस्था नष्ट झाली आहे आणि दिल्लीला ‘रेप कॅपिटल’ म्हटले म्हणून मोदींनीच माफी मागावी.
पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी मेक इन इंडियाविषयी कधी बोलणार ? आम्हाला वाटते वर्तमानपत्र उघडल्यावर त्यात केवळ मेक इन इंडियाच्याच बातम्या असतील. मात्र आता वर्तमानपत्र उघडल्यावर केवल भारतातील बलात्कारांबद्दल वाचतो.