मुंबई : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार ही घोषणा भाजपाच्या जाहिरनाम्यात नव्हती, ही घोषणा शिवसेनेने आपल्या जाहिरनाम्यात केली होती. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असून ही तर उधाराची कर्जमाफी असं  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तिन्ही पक्षाच्या जाहिरनाम्यात सरसकट कर्जमाफीचा उल्लेख होता.

 

मात्र केवळ 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ करण्यात येत आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. या कर्जमाफीचा फायदा अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. हे शेतकरी कर्ज भरू शकेल या स्थितीत शेतकरी नाही, त्यामुळे सरकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

 

CAA संदर्भात मोठा गोंधळ देशात सुरू आहेत. मुस्लीम समाजाच्या मनात विष कलावून त्यांची माथी भडकवण्यात येत आहे. हा कायदा कोणाचे नागरिकत्व घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे. पाकिस्तान, बांग्लादेश, अफगानिस्तामध्ये अल्पसंख्याक समाजवर अन्याय होत आहे. या नागरिकांना नागरिकत्व देण्याचं आश्वासन भारताने त्यावेळी दिले होते. त्यामुळे यामध्ये काहीही गैर नाही असं  देवेंद्र फडणवीस म्हणाले.                                                                                                                      

Find out more: