मुंबई – राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद शिवसेनेने देऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. गृहमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यास मातोश्रीवरही कॅमेरे लागतील, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

 

त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी अर्थखाते, महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहमंत्रिपदही दिले तर तुमच्याकडे काय केवळ मुख्यमंत्रिपद ठेवणार का ? असा सवालही केला आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र काम केले असल्यामुळे शिवसेनेने गृहमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

 

शेतकऱ्यांना सरकारने दिलेली दोन लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे. पण ही शुद्ध फसवणूक असल्याची टीका पाटील यांनी केली होती. सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक असून जो शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता, तो पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरुन यु-टर्न मारल्याचे पाटील म्हणाले होते.                                                                                                   

 

Find out more: