‘आम्ही आत्ताच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यामुळे आमचे घिसे अजून गरम व्हायचे आहेत मात्र विरोधकांचे घिसे पाच वर्षात गरम झालेत त्यामुळे मतदारांनी त्यांच्याकडून लक्ष्मी दर्शन करून घ्यावं पण मत मात्र पंजाला द्यावं, असं खळबळजनक व्यक्तव्य काँग्रेस नेत्या आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकुर यांनी केलं आहे.
वाशिमच्या कामरगाव येथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेदरम्यान यशोमती ठाकुर बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, रात्रीची लक्ष्मी घरी येते, तर येऊ द्या तिला नाही म्हणू नका, असे त्या म्हणाल्या.
तसेच पुढे बोलताना ठाकुर म्हणाले, जी लोक सध्या विरोधात आहेत, त्यांची खिसे खूप भरले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते आपल्या घरी येत असतील. तर त्यांना नाही म्हणू नका. घरी आलेल्या लक्ष्मीला नकार देऊ नका, असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘रात्रीत लक्ष्मी आली तर येऊ द्यायचं, नाही म्हणायचं नाही’ असे ठाकूर यांनी भाषणादरम्यान म्हटलं. त्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक तक्रार दाखल केली आहे. मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळाले.