सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे काय काही महिने देखील टिकणार नाही असा विश्वास विरोधक व्यक्त करत आहे. मात्र हे सरकार पूर्ण वेग चालणार, असा दावा सत्ताधारी पक्षातले नेते करत आहेत.

 

तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांची नाशिक येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अशा 105 जागांवर भाजप निवडून आली तरी विरोधी पक्षात बसली. हा नियतीचा खेळ आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

 

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेला विकास हा गुप्त विकास होता. तो कुणालाच दिसला नाही. हा विकास फक्त भाजप कार्यकर्त्यांच्या पवित्र डोळ्यांना दिसला,’ असे ते म्हणाले. दरम्यान, विकास आघाडी सरकारने दिलेल्या कर्जमाफीला भाजपचे नेते फसविले म्हणतात. आम्ही दोन लाखांची कर्जमाफी केली. काळजी करु नका, कर्जमाफीतून शेतकऱ्यांचा फायदा होईल यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, असे मुंडे म्हणाले.
                                                      
 

Find out more: