वाशिम जिल्हा परिषदेच्या ५२ जागांचे निकाल जाहीर झाले असून सर्वाधिक 12 जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने परिषदेत महाविकास आघाडीची सत्तास्थापन होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

 

वाशिम जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरुवात झाली. यामध्ये मतमोजणीत सर्वाधिक १२ जागा जिंकत राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसने ०९ , वंचित आघाडीने ०८ जागांवर विजय मिळवला. या शिवाय भाजपाला ०७ आणि शिवसेनेने ०६ जागी विजय मिळवला आहे. त्याचवेळी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीचे उम्मेद्वार 6 जागी निवडून आले. स्वाभिमानी शेतकरी संघटना १ इतर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

 

वाशिम जिल्हा परिषद निकाल

एकूण जागा – ५२

जाहीर निकाल– ५२

राष्ट्रवादी – १२
भाजपा – ०७
काँग्रेस -०९
शिवसेना – ०६
वंचित बहुजन आघाडी – ०८
जनविकास आघाडी – ०६
अपक्ष ०३
स्वाभिमानी -०१                                          

Find out more: