भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत भूमिका वाटली तर भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही. असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. ते ठाण्यातील मालवणी महोत्सव कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच ठाण्यातील वर्तकनगर येथील मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांच्या २२व्या मालवणी मोहत्सवा दरम्यान दरेकर यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना दरेकर यांनी भाजप – मनसे संभाव्य युती बाबत सकारात्मक प्रतिकिया दिली आहे. ते म्हणाले, भाजप आणि मनसे युतीची भूमिका या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सध्या तसा काही विचार नाही, अशी माहिती दरेकर यांनी यावेळी बोलताना दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या विचारात बदल केला आणि विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले तर भाजप आणि मनसे भविष्यात एकत्र येऊ शकतात अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप, मनसे संभाव्य युतीवर बोलताना शनिवारी व्यक्त केली .