१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोखले यांना ‘पिफ विशेष पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित वार्तालपात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले बोलत होते. यावेळी बोलताना गोखले यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ‘चित्रपट आम्हाला दाखवा. तो प्रदर्शित करायचा की नाही, हे आम्ही सांगू,’ हा गाढवपणा देशात सुरू आहे. अशा प्रकारांना प्रसिद्धी मिळणे मूर्खपणा आहे,’ अशी टीका गोखले यांनी केली.

 

तसेच ब्राह्मण समाजाला आरक्षण नकोसे आहे. कारण, आम्ही स्वत:च्या क्षमतेवर पोट भरू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. याचप्रमाणे यावेळी त्यांनी आरक्षण, सावरकर वाद, सेन्सॉरशिप आणि नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराजांची देण्यात आलेली उपमा अशा मुद्द्यांवर भाष्य केले.

 

पुढे बोलताना गोखले म्हणाले, ‘शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. ते स्वत:ला कधी जाणता राजा म्हणवून घेणार नाहीत, असे विक्रम गोखले यांनी सांगितले. शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुलना करणे अयोग्य आहे. मी मोदीभक्त नाही. तरीही मी या मताचा असल्याचे विक्रम गोखले यांनी सांगितले.

 

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या अनेक वादांवर त्यांनी मतं व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली. वीर सावरकर, शिवाजी महाराज, शरद पवार, सेन्सॉरशीप अशा अनेक विषयांवर त्यांनी मतं व्यक्त केलीय. ते म्हणाले, सरकार मान्य सेन्सॉरशीप योग्य आहे. पण वेब सिरीजमध्ये गैरफायदा घेतला जातोय. मात्र खासगी सेन्सॉरशीप नकोच, आम्हाला सिनेमा दाखवा आणि त्यानंतर तुम्ही तो प्रसिद्ध करा हा गाढवपणा आहे असं ते म्हणाले.

 

Find out more: