महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु करत आहेत. ही नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. मात्र या नाईट लाईफवर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. मात्र नाईट लाईफ प्रोजेक्टला प्रकाश आंबेडकारांचा पाठिंबा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर नाईट लाईफ प्रोजेक्टला विरोध करणार्यांचा आंबेडकार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी नाईट लाईफच्या जगातच मोठा झालो आहे. ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांच्या विरोधात प्रकाश आंबेडर यांनी येत्या 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याऐवजी तो पैसा वाडीया रुग्णालयाला देण्याच्या माझ्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. मात्र, याचा निर्णय राज्य सरकार आणि कोर्टाने घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.