मुंबई – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिव थाळीसाठी आधार कार्डची सक्तीचे नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने दहा रुपयात जेवण देऊ अशी घोषणा केली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या महिन्यातच ‘शिव भोजन थाळी’ या योजनेची घोषणा करण्यात आली. तसेच मुंबईतील १५ ठिकाणी ही योजना २६ जानेवारी पासून राबविण्यात येणार आहे. पण ज्या अटी आणि शर्ती शिवभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी पुढे येत आहेत, त्यावरुन या योजनेवर टीका सुरु झाली आहे.

 

ग्राहकाला तीन महिन्यांपर्यंत दहा रुपयांची थाळी घेण्यासाठी आपले आधार कार्ड दाखवावे लागणार आहे, तसेच आधारवरील फोटोसोबत त्याचा फोटो देखील जुळवावा लागणार असल्याची चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी शिवथाळी साठी आधार कार्डची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

छगन भुजबळ या विषयी बोलताना म्हणाले, कोणत्याच फोटो किंवा आधार कार्डची शिवथाळी घेण्यासाठी गरज नाही. जास्तीत डास्त गरीबांना याचा फायदा व्हावा यासाठी ही योजना आहे. २०१८ च्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयात थाळी देऊ असे आश्वासन दिले होते. सरकार आल्यानंतर आश्वासनाची पुर्तता देखील केली.                                                  

 

Find out more: