
सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन ‘ या विषयावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे ३० जानेवारी २०२० रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित गांधी भवन येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सहभागी होणारा आहेत.तर सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड,बिशप थॉमस डाबरे यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे .व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी असणार आहेत. ३० जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या शांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. सद्यस्थितीत त्यांच्या विचारांचे स्मरण करणे, हा या सभेचा हेतू आहे. नागरीक नोंदणी रजिस्टर ( एनआरसी ), सीएए, एनपीआर वरून निर्माण झालेली देशातील अस्थिर परिस्थिती सामान्य होण्यासाठी महात्मा गांधींच्या विचारांचा आश्रय घेणे हा एकमेव मार्ग आहे. या विचारातून आपण समस्तांनी गांधींजींचे स्मरण करणे आवश्यक आहे, म्हणून गांधी विचार प्रेमी समस्त नागरिकांना निमंत्रित करण्यात येत आहे’, असे डॉ.कुमार सप्तर्षी यांनी या म्हटले आहे.
महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी दरवर्षीप्रमाणे गांधी भवन येथे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत गांधी आश्रमातील प्रार्थना होईल. सायंकाळी साडेचार वाजता मिनी थिएटरमध्ये ‘ ३० जानेवारी १९४८ ‘ हा माहिती पट दाखवला जाईल. ५ वाजून १८ मिनिटांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.