राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी नेहमीच आक्रमक असतात. बच्चू कडू यांनी सरकारवर कर्जमाफीवरुन आसूड ओढले आहेत. शेतकऱ्यांसाठीची असलेली दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.
आमची आतापर्यंत किती लूट केली, याचा हिशोब सरकारने दिल्याल त्यांच्याकडेच आमचे पैसे निघतील, असं कडू म्हणाले. बच्चू कडू पुण्यात वारकरी संप्रदायाच्या क्रार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळेस पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले.
तुर डाळीचं हमीभाव देणं आणि हमीभाव जाहीर करण्याचं अधिकार हे केंद्र सरकारच्या अख्त्यारित येतं. परंतु केंद्र सरकार हमीभाव जाहीर करत नसल्याची खंत कडूंनी व्यक्त केली.
तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचार ही करू शकत नाही. हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणी असल्याचं म्हटलं. कायद्यावर कायदे येत आहेत. पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा मात्र हे केंद्र सरकार आणू शकत नाही. अशी शोकांतिका शेतकऱ्यांसाठी लढा देणारे राज्यमंत्री बच्चू कडूंनी व्यक्त केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून म्हणताना हिंदुत्व सोडलं नसेल तर ते एनआरसीला समर्थन करतील. असं वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना बच्चू कडूंनी राज्यातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवण्याचा सल्ला भाजपला दिला.