पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात मुंबईत मनसे’च्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. गिरगाव पासून मोर्चाला सुरुवात झाली असून आझाद मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे. तसेच यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. या महामोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी दाखल झाले आहेत.
राज्यभरातून मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत दाखल झाले आहेत. महामोर्चात सहभागी होण्याआधी राज ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर आझाद मैदानात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर आपली भूमिका मांडली. यावेळी आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. पण जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. असा आक्रमक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
तर, अनेक मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे. असा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, मोर्चात सहभागी होण्याआधी महाराष्ट्र सैनिकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर मोर्चात सहभागी झाली आहेत. मात्र मनसेने झेंडा बदलून आपली राजकीय भूमिका बदलली आहे. यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी आक्रमक होत आपली भूमिका जाहीर केली आहे. मनसेने फक्त झेंडा बदलला आहे पण दांडा तोच आहे अस ठणकावलं आहे.
मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात मनसेच्यावतीने आज मुंबईत महामोर्चा निघाला. हिंदू जिमखान्यापासून हा मोर्चा सुरु झाला. आझाद मैदानावर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता झाली. दरम्यान, मनसेच्या महाअधिवेशनात प्रमुख राज ठाकरे यांनी या
महामोर्चाची घोषणा केली होती. देशप्रेमींनी या मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले असून राज्यातूनच नाही तर देशभरातून कट्टर हिंदुत्तावादी संघटना देखील या मोर्चात सहभागी झाल्या.