दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर 24 तासांच्या आत संपुर्ण भारतातून तब्बल 10 लाख लोक पक्षाशी जोडले गेले आहेत. पक्षाचे सभासद होण्यासाठी आपने मोबाईल नंबर देखील सुरू केला आहे. ज्यावर मिस्ड कॉल देऊन आपचे सभासद होता येते.
अधिकृत ट्विट हँडलवरून ट्विट करत आपने याबाबत दावा केला आहे. ट्विटद्वारे पक्षाने सांगितले की, विजयानंतर अवघ्या 24 तासात संपुर्ण भारतातून तब्बल 11 लाख लोक पक्षाशी जोडले गेले आहेत. आपने 70 जागांपैकी 62 जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची कामगिरी केली आहे. या निवडणुकीत भाजपला 8 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.
सलग तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून 16 फेब्रुवारीला शपथ घेणार आहेत. या शपथविधीला सोहळ्याला इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षांचे नेते सहभागी होणार नाहीत.