
मुंबई : शुक्रवारी जगभरात व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं समोर आलं आहे. स्वतः अमृता फडणवीसांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर हे गाणं शेअर केलं आहे. मात्र नेटकऱ्यांकडून त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी हे गाण रेकॉर्ड केलं होतं. लोकप्रिय इंग्रजी गायक lionel richie याने हे गायलेलं आहे. हेच गाणं अमृता फडणवीस गायले. त्यांनी हे गाणे व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून रिलीज केलं आहे. मात्र अमृता यांचं हे गाण ट्वीटरकरांच्या पसंतीस पडलेलं नाही. अनेक युझर्संनी अमृता यांच्या गाण्यावरून खिल्ली उडवत आहेत. एका युझर्सने तर 'हे मले सैन नाई होत' असं सांगणारं 'नाळ' चित्रपटातील श्रीनिवासचा डायलॉगचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. तसेच अनेकांनी कमेंट करत गाण्याची खिल्ली उडवली आहे.