मुंबई – महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात २५ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्ष मोर्चा काढणार आहे. पण त्या मोर्चासाठी कायकर्ते आणणार कुठून, भाजप या आंदोलनासाठी रोजंदारीवर कार्यकर्ते आणणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विचारला आहे.
सत्ता गमावलेल्या भाजपकडे सध्याच्या घडीला कार्यकर्ते उरलेले नाहीत, शिवसेनेने कमळाबाईला सोडचिठ्ठी दिल्याचे नवाब मलिक म्हणाले. भाजप नेते पुन्हा निवडणूका घ्या अशी मागणी करत आहेत, पुन्हा निवडणूका होऊ द्या. पाच वर्षांनी निवडणुका होतील, तेव्हा जे आता निवडून आले आहेत तेवढे देखील आमदार निवडून येणार नाहीत, असे नवाब मलिक म्हणाले.