बीड या राज्यात नव्या सरकारचं कसलंच काम सुरू नाही. केवळ जुन्या योजना रद्द करणे आणि त्याचा अहवाल मागणे एवढंच काम सरकारच सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. या अहवालातून सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर स्वागत करू अन्यथा विरोध करू असा इशारा देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला. जनतेतून थेट सरपंच निवड हा लोकांच्या हिताचा निर्णय होता.
त्यामुळे घोडेबाजार रोखण्यात यश आलं. असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. सध्या भाजपचे चार माजी मंत्री सरकारच्या रडारवर आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र भ्रष्टाचार प्रकरणात माझी कोणतीही चौकशी सुरू नाही. माझी चौकशी सुरू असती तर मला बोलावलं असतं. असा निर्वाळा पंकजा मुंडे यांनी दिला.