मुंबई : ओबीसी़ंची जातनिहाय जनगणना व्हावी, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. राज्य सरकारने पुन्हा याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करावा, असे छगन भुजबळ म्हणाले.

 

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘केवळ इतर मागास वर्गीय अर्थात ओबीसी नाही, तर सर्वच जातींची जनगणना झाली पाहिजे, असे आठवले म्हणाले.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘ओबीसीची जनगणना केल्यास जातीवादाला खतपाणी मिळेल, अशी भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही. जातीची जनगणना झाल्यास त्या संबंधित जातीसाठी आवश्यक त्या उपयाययोजना करणे अधिक सोपे होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

 

दरम्यान, शिवसेनेच्या विचारधारेच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी भूमिका घेत असल्याने हे पक्ष शिवसेनेला अडचणीत आणत असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केलं. राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीला केंद्र सरकार जबाबदार नाही. मात्र, काँग्रेस यात राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.                                                                                                            

 

Find out more: