मुंबई : उद्धवजींनी कर्जमाफी देण्याशिवाय बाकी काही व्हिजनच नाही, त्यामुळे मनमोहन सिंग यांच्याशी तुलना शक्यच नाही. मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते, राजकारणात खूप वर्ष होते, प्रशासन त्यांनी पाहिलं होतं. यांनी काय प्रशासन पाहिलं आहे?,’ असा सवाल उपस्थित करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘अॅक्टीडेंटल प्राइम मिनिस्टर आपण मनमोहन सिंग यांना म्हणतो. त्यांच्या हुशारीचा स्तर किती होता याचा आपण विचार केला पाहिजे. सगळ्या पक्षांनी त्यांना बळ दिलं,’ अशी माहिती पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.
पुढे ते म्हणाले, ‘प्रशासनाचा अनुभव नसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा पक्ष संघटनेचे काम पहावे आणि शिवसेनेच्या सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, असे मत पाटील यांनी बोलताना मांडले.
दरम्यान, ‘सुभाष देसाईसारख्या किंवा एकनाथ शिंदेंसारख्या व्हिजन असणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्री करावे. देसाई यांची सातवी टर्म आहे आमदार म्हणून. प्रश्न, विरोधक, लक्ष्यवेधी अशा अनेक गोष्टींचे त्यांना ज्ञान आहे,’ असं पाटील यावेळी बोलताना म्हणाले.