मुंबई – कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. मुंबई जर नियोजनबद्धपणे बंद ठेवली तर लाखो लोकांना त्याचा फायदा होईल, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
7 दिवसांसाठी जर लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल. आवश्यक दुकाने उघडी ठेवता येतील, पण शॉपिंग मॉल बंद ठेवावे. अशा प्रयत्नांचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
माझी मला सतत मेसेज करणाऱ्यांना विनंती आहे घरीच थांबा, जीवन मरणाचे कारण असेल तर ठीक. यंत्रणांना काम करू द्या, असे आवाहन पंकजा मुंडेंनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर हे नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली तर लोक यासाठी तयारी म्हणून जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील, असेही त्यांनी म्हटले आहे.