नवी दिल्ली : ‘गर्दी करू नका, बाहेर पडू नका, कोरोना;शी दोन हात करण्यासाठी सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करा,’ तसेच नोटांसोबत विषाणूचा प्रसार होण्याचा फार मोठा धोका आहे. याकडे जाणकारांनी याआधीच लक्ष वेधले आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘सामाजिक दूरता पाळणे ही आजच्या काळाची गरज आहे. डिजिटल पेमेंट्स त्यासाठी तुम्हाला मदत करील. या चार मोठ्या लोकांचे ऐका आणि डिजिटल पेमेंटचा वापर करा,’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

तसेच वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी टिष्ट्वटरवर एक व्हिडीओ जारी करून लोकांना आवाहन केले की, ‘तुम्हाला जर पेमेंट्स करायचे असेल, तर ते डिजिटल माध्यमातून करा आणि सुरक्षित राहा.’


दरम्यान, प्रसिद्ध बॅडमिंटनपटू श्रीकांत कदंबी, क्रिकेटपटू स्मृती मंदाना, सिक्वाया इंडियाचे रंजन आनंदन आणि आरिन कॅपिटलचे चेअरमन मोहनदास पै यांनी लोकांना ई-पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन केले होते.

 

 

Find out more: