कोरोना व्हायरसमुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी टेलिकॉम कंपन्यांच्या प्रमुखांना पत्र लिहित प्रवाशांसाठी एक महिने इनकमिंग-आउटगोइंग कॉल मोफत करावे, असे आवाहन केले आहे.

 

या संदर्भात प्रियंका गांधी यांनी मुकश अंबानी (जिओ), कुमार मंगलम बिर्ला (व्होडाफोन-आयडिया), पी. के. पुरुवाल (बीएसएनएल) आणि सुनिल भारती मित्तल (एअरटेल) यांना पत्र लिहिले आहे. प्रियंका गांधींनी आपल्या पत्रात लिहिले की, मी तुम्हाला विनंती करते की पुढील एक महिन्यासाठी इनकमिंग आणि आउटगोइंग मोफत करावे. जेणेकरून लोक आपल्या कुटुंबियांशी बोलू शकतील.


त्यांनी लिहिले की, ‘देशभरातून लाखो मजूरकभूख, तहान आणि आजारांशी लढत आपल्या घरी आणि कुटुंबाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटते की या संकटाच्या काळात आपल्या देशातील नागरिकांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. लाखो लोक आपल्या घरीत जात आहे व त्यांचा मोबाईल रिचार्ज संपला आहे.

 

याचा अर्थ ते आपल्या नातेवाईकांना फोन करू शकत नाहीत व कॉल देखील रिसिव्ह करू शकत नाही.  त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की, इनकमिंग आणि आउटगोइंग सुविधा एक महिन्यांसाठी मोफत करावी. जेणेकरून आपल्या सर्वात कठीण प्रवासाला निघालेले लोक कुटुंबियाशी बोलू शकतील.

https://mobile.twitter.com/hashtag/FreeCalling?src=hash&ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1244266253604143106&ref_url=https%3A%2F%2Fwww.majhapaper.com%2F2020%2F03%2F30%2Fpriyanka-gandhi-wrote-a-letter-to-jio-airtel-vodafone-idea-and-bsnl-for-free-calling-during-coronavirus-lockdown%2F

Find out more: