अहमदनगर : संपुर्ण जगासह भारताला पण कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे, पण शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे या संकटाविरोधात यशस्वी लढा द्यायचा आहे.
त्यामुळे नागरिकांना सरकार आणि प्रशासन ज्या गोष्टींचे पालन करायला सांगत आहे त्या केल्याचं पाहिजे असे आवाहन समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. याबाबत अण्णांनी आज एका व्हिडीओ संदेशात नागरिकांनी बाहेर गर्दी न करता घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
आपण ही लढाई एकीच्या बळावर नक्कीच जिंकू मात्र त्यासाठी थोडा त्रास सहन करून संयम पाळण्याची गरज असल्याचे अण्णांनी म्हंटल आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच डॉक्टर्स, नर्स, पोलिसांचे मानावे तेवढे आभार कमी आहे.
त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे आणि त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे असेही अण्णांनी संदेशात या संदेशामध्ये म्हंटल आहे.