पुणे : कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सर्वांनाच वारंवार घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली.
दरम्यान कोरोना साथीच्या नँशनल लॉकडाऊनमुळे यावर्षीची 14 एप्रिलची आंबेडकर जयंती ही आपआपल्या घरातच साजरा करा, असं आवाहन बाबासाहेबांचे वारसदार आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आता गुढीपाडवा, रामनवमीप्रमाणे आता आंबेडकर जयंतीदेखील रद्द झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 14 एप्रिल रोजी हे 21 दिवस संपणार आहे. या दिवशी देशभरातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता धोका वाढला आहे.
मात्र काही आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकर जयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचं आयोजन केले होते. पण महाराष्ट्रातला व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंबेडकरी अनुयायांनी जयंतीच्या नावाखाली अजिबात घराबाहेर पडू नये, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.
यासोबतच जयंतीच्या नावाने गोळा केलेली वर्गणी कार्यकर्त्यांनी कोरोना बाधित गरजूंना वाटप करण्यात यावी असंही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.