नाशिक : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्यात डॉक्टर आरोग्य सेविका नर्स कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. तर स्वतः च्या जिवाची पर्वा न करता पोलिसही रस्त्यावर उतरले आहेत.

 

शासनाने आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण दिले आहे. अशाचप्रकारे शेतकरी शेतात काम करुन लोकांसाठी शेतमाल पिकवत आहे. व घराघरात जाऊन त्याची होम डिलिव्हरी करीत आहेत.

 

आरोग्य कर्मचाऱ्यांसारखेच शेतकऱ्यांनाही विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना जशी वागणूक दिली जाते तशीच वागणुक राज्यकर्त्यांनाही दिली जावी अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

                                          

Find out more: