उत्तर प्रदेशातील बुलंदशहर भागात दोन साधूंची हत्या झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच इतर मंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुलंदशहर घटनेवर प्रतिक्रीया देताना, पालघरच्या घटनेचा दाखला देत योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला चिमटे काढले.
संजय राऊत यांच्या आरोपाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाद्वारे ट्विट करत सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. बुलंदशहर घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सांभाळा उत्तर प्रदेशची चिंता करु नका अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे. याचसोबत पालघर मधील साधुंच्या हत्येबद्दल कोण राजकारण करत आहे असा सवालही आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.