भाजप नेते निलेश राणे यांनी औरंगाबादमधील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करुन तीन कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या घटनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन बांगड्यांचे दुकान उघडले पाहिजे, असा टोला राणे यांनी लगावला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी अजून किती सहन करायचे? असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे.
निलेश राणे यांनी औरंगाबाद-पैठण रोडवरील बिडकीन येथील संभाजीनगर मार्गावर असणाऱ्या अमिरनगर-प्रकाश नगर येथे धार्मिक स्थळाजवळ पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरुन राज्य सरकारवर कठोर शब्दात टिका केली आहे. निलेश राणे यांनी या बातमीसंदर्भातील एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना एक ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचे दुकान उघडलं पाहिजे. पोलिसांनी किती सहन करत राहावे??? काय मर्यादा आहे की नाही. गुन्हे झाले की दोन-तीन कलमे लावून विषय विसरायचा आणि राज्य सरकार आम्ही कार्यवाही केली सांगून मोकळे (होते),” असे म्हटले आहे.