
कोरोना संकटकाळात सर्वात जास्त अडचणीत आलेल्या गरिब, कष्टकरी, मजूरांच्या घरी जाण्याचा खर्च काँग्रेस करणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यासंदर्भात घोषणा केली आहे.
गरिब, कष्टकरी, मजुरांना मोदी सरकारने वाऱ्यावर सोडले असून महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजूरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी करणार आहे, असं महाराष्ट्र काँग्रेसनं जाहीर केलं आहे. याप्रमाणे प्रत्येक राज्यातील काँग्रेस त्या त्या राज्यातील मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलणार आहेत.
सरकारने स्थलांतरित कामगारांचा मोफत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित केला पाहिजे. मात्र वारंवार मागणी करूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. १९४७ च्या फाळणीनंतर भारताने एवढी मोठी मानवीहानी कधीच पाहिलेली नाही. स्थलांतरित कामगारांची दशा तर अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
जर सरकार परदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांसाठी मोफत हवाई प्रवासाची व्यवस्था करू शकते, फक्त एका कार्यक्रमावर १०० कोटी खर्च करू शकते, रेल्वेमंत्री PM Cares साठी १५१ कोटी देऊ शकतात तर मग स्थलांतरित मजुरांचा प्रवास मोफत का केला जात नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे.