पुणे : आम्ही सर्व सहकार्य करु. मास्क, पीपीई किटस पुरवण्याचा प्रयत्न करु. रुग्णांना तुमची गरज आहे’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांना लवकरात लवकर ओपीडी सुरु करण्याचं आवाहन केलं आहे.
आज फेसबुक लाईsuव्हच्या माध्यमातून त्यांनी घरगुती हिंसाचार आणि महिला सुरक्षा या विषयांवर संवाद साधला. महिलांविरोधात हिंसाचार सुरुच आहे. करोनाचं संकट संपल्यानंतर बेरोजगारी वाढणार आहे. महिलांसमोर आव्हान असणार आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान,घरगुती हिंसाचारासंबंधी अनेक कायदे आहेत. आता नवीन कायदा करण्याची वेळ नाही. समुपदेशनाच्या मदतीने संसार वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
“महिलांविरोधात हिंसाचार सुरुच आहे. करोनाचं संकट संपल्यानंतर बेरोजगारी वाढणार आहे. महिलांसमोर आव्हान असणार आहेत” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. “घरगुती हिंसाचारासंबंधी अनेक कायदे आहेत. आता नवीन कायदा करण्याची वेळ नाही. समुपदेशनाच्या मदतीने संसार वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.