नितेश राणेंनी सिंधुदुर्गजिल्हा रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचा इशारा दिला आहे. राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्याने आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. यावरून नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे जिल्ह्यात आणखी एक रुग्ण सापडला आहे.

 

त्याला प्रशासनाने घरी सोडले होते, असे समजत आहे. आंबा वाहतूक करणाऱ्या चालकांबाबत सांगूनही लक्ष दिले नाही. ग्रीन झोनचे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा रेड झोनकडे वाटचाल करत आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

https://mobile.twitter.com/NiteshNRane/status/1257687204681453569?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1257687204681453569&ref_url=https%3A%2F%2Finshortsmarathi.com%2Fsindhudurg-district-is-moving-towards-red-zone-serious-allegations-by-nitesh-rane%2F

Find out more: