जालना येथून रेल्वेच्या मार्गावरून मध्यप्रदेशात परतणारे 16 मजूर औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे मालगाडी खाली चीरडले गेले. या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मदत केली आहे.

 

भारतीय रेल्वे नेही ही या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री व संस्कृतीक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.

 

महाराष्ट्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारने या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली आहे. भारतीय रेल्वेनेही आपली जबाबदारी ओळखून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.

 

लॉक डाऊन मध्ये ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एसटीची सोय करण्यात केली जात आहे.

 

विशेष रेल्वेही सोडण्यात येत आहेत त्यामुळे मजुरांनी रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याचा धोका न पत्करता या सेवेचा लाभ घ्यावा आणि सुखरूप पणे घरी परत जावे असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

Find out more: