कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी परत एकदा संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेचे दुःख व्यक्त केलं. औरंगाबाद-जालनाजवळ मजुरांची झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी, मजुरांनी संयम बाळगावा, आम्ही राज्यांशी संपर्क करुन ट्रेन सुरु करत आहोत, हळूहळू मजुरांना पाठवू, पण संयम ठेवा आणि जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघाले आहेत त्यांना राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे.
घरी जाण्याची घाई करु नका आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन केलं आहे. तसेच राज्य सरकारने आपल्या राहण्याची व्यवस्था केली आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करुन आपल्यापर्यंत मदत पोहचवण्याचं काम करत आहोत.
तसेच इतर राज्यातही ट्रेन सुरु करुनइतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकारने एक दिलासा दिला आहे. आपण थोडा संयम ठेवला तर सरकारला संधी मिळेल आणि लवकरच ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आपआपल्या स्वगृही पाठवण्यात येणार असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हंटल आहे.
आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येतं आहे. तुम्ही थोडासा संयम बाळगा आम्ही तुमच्यासोबत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मुंबईबाबत बोलतांना मुंबईत लष्कराचा ताब्यात देणार अशी एक अफवा पसरवली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं कुणीही अफवांवर विश्वा ठेऊ नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.
तसेच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. कोरोनाला सर्वजण एकत्र आणि एकजुटीनं हरवू असा दिलासा त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे.