राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २०० घटना घडल्या. त्यात ७३२ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ९ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ०१ हजार ३१६ गुन्हे नोंद झाले असून १९,५१३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२ लाख २७ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लाँकडाऊनच्या काळात  या १०० नंबरवर  प्रचंड भडिमार झाला. ८७,८९३ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

 

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६६० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २ लाख ५५ हजार २६६ व्यक्ती आहेत, अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

Find out more: