राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उतरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवनात दाखल केला.

 

येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.मंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.

 

त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी लवकरात लवकर आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊ नये, आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती.

 

त्याप्रमाणे आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार झाले म्हणून अभिनंदन करण्यात आले आहे.

 

आमदारकीचे टेन्शन संपले, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, असं ट्वीट करत महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि मुंबईतील कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केल आहे.

Find out more: