केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा. केंद्राने सावकाराचं काम करू नये. मजुरांना कर्जाची नाही तर पैशाची गरज आहे, असं काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्र सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे एकप्रकारे कर्ज आहे. सध्या शेतकरी आणि शेतमजूरांना कर्जाची नाही तर पैशांची गरज आहे. आणि ते पैसे सरकारने त्यांच्या थेट हातात द्यायला हवेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. लोकांच्या खिश्यात जर पैसे नसतील तर लोक काय खाणार? असा सवाल त्यंनी केंद्राला केला. भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल.
सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असा सल्ला त्यांनी केंद्राला दिला.
मजुर आपापल्या गावाकडे चालत जात असताना त्यांचे अपघात होत आहेत. हे पाहून माझ्या मनाला यातना होत आहेत. कोट्यवधी लोक बिना अन्न पाण्याचं रस्त्यावर हिंडत आहे. सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या पॅकेजचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं राहुल म्हणाले.