महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून राजकारणावर बोलेन पण आता माझं लक्ष कोरोनावर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
ऑनलाईन खरेदीवर भर द्या, सार्वजनिक वाहतुकीत बोलू नका, कोणाकोणाला भेटलात याची यादी बनवत राहा, एकत्र जेवताना समोरासमोर बसू नका, जिम-रेस्टॉरंट मालकांनी सूचना पाळाव्या, आपण सुरु करु, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.